Ad will apear here
Next
तनाएराचे महाराष्ट्रातील पहिले दालन पुण्यात सुरू
अभिनेत्री श्रुती मराठेच्या हस्ते उद्घाटन
तनाएरा दालनाच्या उद्घाटनप्रसंगी तनाएराच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजेश्वरी श्रीनिवासन,अभिनेत्री श्रुती मराठे व रिटेल हेड जसवंत थॉमस

पुणे : देशभरातील हातमागावरील साड्या उपलब्ध करून देणाऱ्या टायटन कंपनीच्या तनाएरा ब्रँडचे महाराष्ट्रातील पहिले दालन पुण्यात सुरू झाले आहे. औंधमधील पुष्पक पार्क येथील या दालनाचे उद्घाटन अभिनेत्री श्रुती मराठे  हिच्या हस्ते झाले. या वेळी तनाएराच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजेश्वरी श्रीनिवासन उपस्थित होत्या.

३६०० चौरस फुटांचे हे प्रशस्त दालन असून, येथे   देशभरातील हातमागावर विणलेल्या पारंपरिक वस्त्रशैलीतील साडयांचा खजिना उपलब्ध आहे. बनारसी सिल्क, कांजीवरम, चंदेरी, महेश्वरी, जामदानी, इक्कत, टसर सिल्क अशा विविध प्रकारच्या साड्यांचे असंख्य नमुने येथे पहायला मिळतात.  


या वेळी राजेश्वरी श्रीनिवासन म्हणाल्या, ‘दिल्ली, बंगलोर या शहरांमधील आमच्या दालनांना मिळत असलेला भरघोस प्रतिसाद पाहता पुण्यातही आमचा ब्रँड ग्राहकांच्या पसंतीस उतरेल याची आम्हाला खात्री आहे. पुण्यातील आधुनिक, चोखंदळ स्त्रियांना तनाएरा आपलेसे वाटेल याची आम्हाला खात्री आहे.’   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVCCF
Similar Posts
‘टायटन’चा वस्त्रप्रावरणाच्या क्षेत्रात प्रवेश नवी दिल्ली : घड्याळे, दागिने, अशा जीवनशैलीशी निगडीत वस्तूंच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या टायटन कंपनीने ‘तनाएरा’ हा वस्त्रप्रावरणांचा खास ब्रँड दाखल केला आहे. नवी दिल्ली साऊथ एक्स्टेंशन-१, येथे या ब्रँडचे पहिले दालन सुरू करण्यात आले असून, अभिनेत्री कंगना राणावत हिच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले
देशातील दुसरे रिट्झ-कार्ल्टन हॉटेल पुण्यात सुरू पुणे : आलिशान हॉटेल्सचा आघाडीचा ब्रँड म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या रिट्झ-कार्ल्टनचे पुण्यात आगमन झाले आहे. भारतातील हे दुसरे रिट्झ-कार्ल्टन हॉटेल आहे. यामुळे आदरातिथ्य क्षेत्रातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित झाले असून, पुण्याच्या दिमाखात अधिकच भर पडली आहे. येरवडा परिसरातील गोल्फ कोर्सजवळ ‘बिझनेस बे’लगत हे अलिशान हॉटेल साकारले आहे
‘उद्योगांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक’ पुणे : ‘अत्यंत अद्ययावत असे ‘इंडस्ट्री फोर पाँईंट झीरो’ तंत्रज्ञान, ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘मशीन लर्निंग’ हे आजच्या जगातील परवलीचे शब्द झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील ही आव्हाने असून, लवकरात लवकर त्यांचा सामना करून नवे तंत्रज्ञान अवगत करून
‘एमव्हीएसटीएफ’ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्कार पुणे : महाराष्ट्रातील एक हजार खेड्यांचा कायापालट घडविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनला (MVSTF) पुणे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language